पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर
शासनामार्फत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊच्या आधी आहे. त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.www.konkantoday.com