
प्रतीमात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कणकवलीच्या सभापतींसह भाजपच्या १९ पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल
सिंधुदुर्गात गेले दोन दिवस आजी-माजी खासदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला होता. आरोप-प्रत्यारोप आणि दोन्ही बाजूंकडून इशारे देण्यात येऊ लागल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून सिंधुदुर्गातील राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील शहरांमध्ये दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. रविवारी दिवसभरात या वादात आणखीन भर पडली नसल्याने तो आता शमण्याची चिन्हे आहेत. तर शनिवारी शिवसेना खा. विनायक राऊत यांचा प्रतीमात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी कणकवलीच्या सभापतींसह भाजपच्या १९ पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल केले आहेत
www.konkantoday.com