नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्याची प्रवाशांची मागणी-राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले
दापोली:-खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्याची प्रवाशांची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पोस्टल रजिस्टर द्वारे केली आहे www.konkantoday.com