
चिपळूण नगर पालिकेच्या नवीन इमारतीसाठी २२ कोटींचा प्रस्ताव, परंतु अजून तांत्रिक मंजुरी नाही
चिपळूण नगर पालिकेची ब्रिटीशकालीन इमारत धोकादायक बनल्यानंतर आता प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. नगर पालिकेच्या पूर्ण नवीन इमारतीसाठी वाढीव डीएसआरनुसार सुमारे २२ कोटींचा नवीन प्रसताव सादर केला आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.चिपळूण नगर पालिकेची पूर्णपणे नवीन अत्याधुनिक, तसेच पुरमुक्त इमारत उभारण्यासाठी सन २०१८ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाने त्याची दखल घेवून एजन्सीची नियुक्ती देखील केली होती. त्यानुसार नवीन इमारतीचे डिझाईन तयार करून चिपळूण नगर पालिकेला देण्यात आले होते. नगर पालिका सभागृहात त्याचे सादरीकरण देखील करण्यात आले होते. त्यावेळी आराखडा तसेच डिझाईनमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून देत नगरसेवकांनी आराखड्यामध्ये काही किरकोळ बदल सूचविले होते. त्याप्रमाणे सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा तो प्रस्ता तयार करण्यात आला होता.www.konkantoday.com