
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आता जिल्हा स्तरावरच कंट्रोल रुम
राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी राज्यात कोरोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता जिल्हा स्तरावरच कंट्रोल रुमची उभारणी केली जाणार आहे.
www.konkantoday.com