
संजय राऊत हे ‘सिल्वर ओक’चे सुपारीबाज नेते-मनसेचे नेते प्रकाश महाजन
महाराष्ट्रातील शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे, हा राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम असून सुपारी गँग नसती तर राज्यात महाविकास आघाडीच्या ३८ जागा निवडून आल्या असत्या, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.त्यांच्या या टीकेला आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे ‘सिल्वर ओक’चे सुपारीबाज नेते आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती. ते त्यांनी करून दाखवलं. त्यांनी शिवेसेनेचे दोन तुकडे करू दाखवले”, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. “संजय राऊत हे दुसऱ्यांवर सुपारी घेण्याचे आरोप करतात, मात्र, त्यांनी पत्राचाळीची सुपारी घेतली होती. ते शरद पवारांच्या सिल्वर ओकवर दलाली करतात, ते सिल्वर ओकचे सुपारीबाज नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या टीकेवर लक्ष देण्याची गरज नाही”, असेही ते म्हणाले.www.konkantoday.com