संगमेश्‍वर तालुक्यातील आरवलीत उड्डाणपुलावरील रस्त्याचा भाग खचला

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाबद्दल सर्वत्रच विदारक चित्र पुढे येत आहे. महामार्गावर संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली उड्डाणपुलाजवळ खेरशेतजवळ रस्त्याखालचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. वाहून गेलेला भराव लक्षात येवू नये म्हणून संबंधित ठेकेदाराने मातीचे ढीग आणून ओतले आहेत. तरीही दोन ढिगांमध्ये शिल्लक राहिलेल्या जागेत धोकादायक स्थिती पहावयास मिळते.या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने पुलावरून जाणार्‍या वाहनचालकांना याची जाणीव होत नाही पंरतु पुलाखाचे चित्र सर्व्हिस रोडवरून स्पष्ट दिसते. दुहेरी वाहतूक सुरू असल्याने या पुलाला मोठा धोका पोहचण्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button