
शिवसेना ( उबाठा गटाचे नेते) उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दंड ठोठावला
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ( उबाठा गटाचे नेते) उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.येत्या दहा दिवसांत ही रक्कम राहुल शेवाळे यांना देण्यात यावी असा आदेशही न्यायालयाने दिला. राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.www.konkantoday.com