
रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरू होवूनही जिल्ह्यात पाणीटंचाई कायम
रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे निर्माण झालेले संकट आता पावसाळा सुरू झाला असतानाही कायम आहे. अजूनही जिल्ह्यात जूनच्या अहवालानुसार १२२ गावे व २९७ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांतील ६० हजार ५२३ ग्रामस्थाांना या टंचाईचा सामना करावा लागत आहे.यावर्षी जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना जूनपर्यंत या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनस्तरावरून पाणीपुरवठ्यासाठी २२ खाजगी व ४ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या. २९७ वाड्यांतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला अद्यापही मोठी कसरत करावी लागत आहे. आता तर पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होईल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com