महामार्ग पूर्ण होण्याची प्रतिक्षा लांबत असल्याने कोकणवासियांना सहन करावा लागतोय अडचणींचा सामना
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा विचार करता कोकणवासीय आतापर्यंत असे बरेच काही सहन केलेले आहे. पण महामार्गाचे काम पूर्णतः मार्गी लागण्याची त्यांची प्रतीक्षा ही लांबतच चालली आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.गेली ११ वर्ष मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या आरवली बावनदी आणि बावनदी ते वाकेड या दोन टप्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.अनेक ठिकाणी डोंगर कापून रस्त्याचे ढीग येण्याचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खोल दरीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यावर माती येवून चिखलामुळे अपघात आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री ते बावनदी दरम्यान अनेक ठिकाणी डोंगर कापल्यामुळे मातीचे ढीग रस्त्यावर आले आहेत. अशा ठिकाणी सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी एका बाजूला दरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.www.konkantoday.com