भरणे येथील ब्रिटीशकालीन जुना पूल अखेरची घटका मोजतोय
भरणे येथील ब्रिटीशकालीन जुना पूल अखेरची घटका मोजत आहे. नवा जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे जुन्या जगबुडी पुलाचा वापर पूर्णपणे थांबला आहे. यामुळे धोकादायक अवस्थेतील जुना जगबुडी पूल आता नावापुरताच राहिला असून पुलाचे प्रशासन नेमके करणार काय, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.दीडशेहून अधिक वर्षापासूनचा जूना ब्रिटीशकालीन पूल अनेक घटनांचा साक्षीदार आहे. या जुन्या जगबुडी पुलावरून दिवसाकाठी हजारो वाहने धावत होती. मात्र तुफानी पर्जन्यवृष्टीत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडताच जगबुडी पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागत होता. वर्षानुवर्षे ही परिस्थिती कायम राहिली होती. याच जुन्या जगबुडी पुलावर १९ मार्च २०१३ मध्ये महाकाली खासगी आरामबसला झालेल्या भीषण अपघातात ३७ जणांना प्राणास मुकावे लागले होते. www.konkantoday.com