प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा महावितरणचे घरगुती ग्राहकांना आवाहन

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा महावितरणचे घरगुती ग्राहकांना आवाहन कोकण परिमंडळ : केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट रू.३० हजार अनुदान आहे. ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे विजेची निर्मिती करून वापरणे व गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास ग्राहकास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेत रत्नागिरी जिल्ह्यात ९७ हजार ५०० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे रूफटॉप सौर यंत्रणा बसविण्याचे लक्ष्य आहे. घरगुती ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.१ किलोवॅट क्षमतेची रुफ टॉप सौर यंत्रणा बसविण्यासाठी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीज निर्मिती होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button