चिरेखाणीत सापडलेल्या रसायनमिश्रित घातक पदार्थांच्या गोण्यांबाबत प्रदूषण मंडळाकडून दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील उभळे येथील उघड्या चिरेखाणीत दुसर्या दिवशी पुन्हा रसायनमिश्रित घातक पदार्थांच्या गोण्या आढळल्या. मात्र या प्रकरणी २ दिवस उलटूनही व तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी या सूचना देवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केलेली नाही. तर तिसर्या दिवशीही खाणमालकाचा शोध महसूल यंत्रणेला लागल्याने या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणा दबावाखाली काम करीत आहेत का, असा सवाल उपस्थित करत यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.उभळे येथे चिरेखाणीत रसायनमिश्रित गोणी मोठ्या प्रमाणात आढळलेल्या या खळबळजनक प्रकाराने या भागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पावसाळ्यात येथील चिरेखाणी तुडुंब भरतात. गोण्यांमधील हे रसायनमिश्रित घातक पदार्थ पाण्यात मिसळून ते नद्या, नाले यांना प्रवाहित होणार आहे. त्यामुळे आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा प्रकार उघडकीस येवून दोन दिवस झाले व महसूल यंत्रणेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना कळवूनही ते घटनास्थळी फिरकलेले नाहीत. यावर संताप व्यक्त होत आहे. तर चिरेखाणींची परवानगी व कोणत्या भागात किती खाणी, यांची संपूर्ण माहिती महसूल यंत्रणेकडे असतानाही गोणी सापडलेली खाण कुणाची, याचा शोध तिसर्या दिवशीही लागत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय महसूल विभागाच्या तपासावरही शंका घेतली जात आहे. www.konkantoday.com