
चिपळूण जवळ खेर्डी येथे इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोघांचा मृत्यू
चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.३० वाजता घडली. लाकडी पलांजा तुटल्याने ही घटना घडली.यामध्ये खेर्डी शिगणवाडी येथील तरुणासह एका मजूर महिलेचा समावेश आहे.सुरेश मारुती शिगवण (36 खेर्डी शिगवणवाडी) व पूनम दिलीप सहा (40 खेर्डी शिवाजीनगर, मूळची बिहार) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरु होते. त्यासाठी दुसऱ्या माजल्यापर्यंत लाकडी पलांजा बांधण्यात आला होता. त्यातील एक बांबू तुटल्याने त्यावर उभे असलेले दोघेजण दुसऱ्या माजल्यावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले.www.konkantoday.com