खेड तालुक्यातील वेरळ येथून २ लाखाचे बांधकाम साहित्य चोरीस
खेड तालुक्यातील वेरळ येथून ऑगस्ट २०२२ पासुन मुदतीत २ लाख ११ हजार ५०० रुपयांचे बांधकामासाठी लागणारे साहित्य लंपास केल्याप्रकरणी अजय श्रीरंग माने याच्यावर मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबत कौस्तुभ हिराचंद बुटाला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. माने हा बुटाला यांच्याकडे सुपरवायझर म्हणून कामाला होता. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमधून स्टील, शटरींग प्लेट, कॉम्पेक्टर, स्लॅश व्हायब्रेटर मशिन व बांधकामासाठी लागणारे साहित्य शेडचा दरवाजा उघडून लंपास केले. साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. www.konkantoday.com