कोरोना नसताना देखील पीपी किट घालून करावे लागले अंत्यसंस्कार, वैभववाडीतील घटना

करोना नसताना देखील अंत्यसंस्कार करताना पीपी किट घालावे लागण्याचा प्रकार वैभववाडीत घडला आहेस्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथे घडली. अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली.तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण (वय 70) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी सकाळी नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातून बाहेर काढला. यावेळी सुमारे 70 ग्रामस्थ उपस्थित होते. विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता.स्मशानभूमीत काही ग्रामस्थ सुकलेली लाकडे जाळून धूर करत होते. स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत झाडावर काळंबा मधमाशांचे पोळे होते. धुराचा लोळ त्या मधमाशांच्या पोळाकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या. उठलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटले. अनेक जण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले.मधमाशांनी ग्रामस्थांचा जवळपास एक किलाेमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. या हल्ल्यानंतर तब्बल अडीच तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट घटनास्थळी नेण्यात आले. त्यानंतर मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलाने किट घालून विधी पूर्ण केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button