कोकणाचा जिवंतपणा जपणारे कातळसडे आता पुन्हा जीवंत होवू लागले
कोकणाचा जिवंतपणा जपणारे कातळसडे आता पुन्हा जीवंत होवू लागले कोकणाचा जिवंतपणा जपणारे कातळसडे आता पुन्हा जीवंत होवू लागले आहेत. वरकरणी हे सडे ओसाड माळरान वाटत असले तरी ते कोकण अर्थव्यवस्थेचा एक भक्कम स्त्रोत आहे. पावसाचं प्रमाण आता हळुहळू वाढू लागले आहे. आता गावागावातले हेच कातळसडे खर्या अर्थाने जिवंत होवू लागले आहेत. पाण्याचा अमाप साठा असलेले हेच कातळसडे खर्या अर्थाने पाण्याची टंचाई दूर करणारी देवस्थाने आहेत. हेच कातळसडे जपले तर कोकणातील कोणत्याच गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे मत अनेक जैवशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.रत्नागिरी जिल्हा असो अथवा सिंधुदुर्ग कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांनी कधी अती पाणीटंचाई अनुभवली नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात कोकणातल्या अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. सध्या कोकणात सर्वच कातळसड्यांवर चाललेल्या अनेक घडामोडी हेच या पाणीटंचाईचे मुख्य कारण असल्याचे जैवशास्त्राचे मत आहे. सध्या या सड्यावर मोठ्या प्रमाणावर चाललेले रहिवासी बांधकाम, चिरेखाणींचे वाढलेले प्रमाण त्याचबरोबर कातळसड्यांवर होणारे आधुनिकीकरण यामुळे कातळसड्यांवरचे पाण्याचे स्त्रोत विचलित होत आहेत. व याचाच परिणाम म्हणून कातळसड्यांच्या उतारांवर असणार्या व जवळपासच्या गावातील विहिरींचे पाणी आता आटायला लागले आहे. पाण्याचे पारंपारिक पाट नष्ट होत आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा करणारी पाण्याची शिवकालीन तळीही आता कोरड्या होवू लागल्या आहेत. www.konkantoday.com