
आपत्तीवर मात करण्यासाठी विभागांनी दक्षता घ्यावी -चंद्रकांत सुर्यवंशी
जिल्ह्यात उभ्या ठाकणार्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सूर्यवंशी यांनी बुधवारी मान्सून तयारीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपत्तीच्या अनुषंगाने आपत्ती निवारण कक्ष, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व इतर विभागांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने कंट्रोल रूम २४ तास ऍक्टीव्ह ठेवावेत. आलेल्या आपत्ती माहितीबाबत नोंद ठेवावी. संबंधित विभागाकडे त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. पर्जन्यमान तसेच नुकसानीबाबत माहिती नियमित पाठवावी. आरोग्य विभागाने या कालावधीत येणारे साथीचे रोग तसेच सर्पदंशाच्या अनुषंगाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा शासकीय रूग्णालय, प्राथमिक रूग्णालयात ठेवावा. www.konkantoday.com