*आंबा घाटाला पर्याय म्हणून असलेल्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, दरड बाजूला करण्याचे काम सुरू
कोकणात अतिवृष्टीमुळे अनेक वेळा घाटात दरड कोसळण्याचे प्रसंग येतात आंबा घाटाला पर्याय म्हणून असलेल्या अणुस्कुरा घाटात पहिल्याच पावसात काल दरड कोसळली आहे यामुळे कालपासून तेथील वाहतूक बंद झाली आहे ही दरड बाजूला करण्याचे काम सध्या पातळीवर सुरू आहे
अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरु आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आले आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल. तोपर्यंत अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
www.konkantoday.com