
निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत-पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील निसर्ग वादग्रस्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून महाविकास आघाडीच्या शासनाने एनडीआरएफचे निकष बदलून जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत देता येईल असे धोरण स्वीकारले आहे.आतापर्यंत रत्नागिरी जिल्हय़ाला ११६ कोटी रुपये मिळाले आहेत.घरासाठी असणाऱ्या निधीचे ८५ टक्के वाटप झाले आहे.अजून घरांसाठी ५६ कोटीची मागणी करण्यात आली आहे.घर व गोठ्यांना प्राथमिकता देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.फळ बागांसाठी निधी आला असून त्यापैकी ४६ लाखाचे वाटप झाले आहे.अनेक ठिकाणी सामूहिक शेती व फळबागा असल्याने सातबारावर अनेक लोकांची नावे असल्याने त्यांच्या संमतीशिवाय वाटप होण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.त्यामुळे आता त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन त्यांना लवकरात लवकर पैसे देण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.काही लोकांनी पंचनामा पेक्षा आपले जास्त नुकसान झाल्याचा तक्रारी केल्या आहेत.अशा तक्रारदारांचे परत सर्व्हे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com