सुनेत्रा पवार यांच्या रूपाने बारामतीला तिसरा खासदार
राष्ट्रवादी अजित पवार गटातून रिक्त झालेल्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.विरोधात कोणताही उमेदवार न आल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वीच पराभवाला सामोरे गेल्यानंतरही सुनेत्रा पवार यांची मागच्या दाराने संसदेमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने बारामतीला तिसरा खासदार मिळाला आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेला मोठा पराभव करत खासदारकीची हॅट्रिक केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा राज्यसभेवर खासदार आहेत.www.konkantoday.com