रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मतदारसंघात पैशाचा धबधबा पडल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा , शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार तुम्ही आहात. मोदींना एवढी आघाडी कशी मिळाली म्हणून जग हळहळतं. हा मोदींचा पराभव आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.अमोल किर्तीकरची जागा ढापली. मोदींचा विजयही ढापलाय का? हे लोक विचारतात. चौथी जागा आपण जिंकलो आणि पाचवीही जिंकू शकलो असतो, भाजप सहा शून्य हरलं असतं. लोकसभेत पैशांचा धबधबा पडला, आताही पडेल. विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय घडलं, हे मी ऐकलं, त्या संदर्भातही आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.www.konkantoday.com