
रत्नागिरी जिल्ह्यातील मानधन तत्वावरील प्राथमिक शिक्षक दोन महिने मानधनाविना
मागील शैक्षणिक वर्षात शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासली. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक डी.एड., बी.एड. पदवीधर शिक्षकांना जिल्हा परिषदेने संधी दिल्यामुळे महिना जास्तीत जास्त नऊ हजार किंवा सुट्टीच्या दिवसाचे प्रत्येक दिवशी ४८० रुपये मानधन कमी करून काम केले. दि. ३० एप्रिलला शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शिक्षक भरतीदेखील अंतिम टप्प्यात होती. त्यामुळे सर्व मानधन तत्वावरील शिक्षकांना कार्यमुक्त केले. परंतु मार्च, एप्रिल या दोन महिन्याचे मानधन जून महिना उजाडला, तरी अद्याप मिळालेले नाही.www.konkantoday.com