मिर्या बंधार्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसापूर्वी सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी विचारला जाब
मिर्या बंधार्याच्या धोकादायक टप्प्याचे काम पावसाळा सुरू झाला तरीही न झाल्यामुळे मिर्या ग्रामस्थ मंगळवारी पत्तन विभागावर धडकले. गावचे संरक्षण करण्यासाठी बंधार्याचे काम करण्याची मागणी केली. ठेकेदार व सल्लागार कंपनीशी बोलून यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पत्तन अधिकार्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यामुळे मिर्या ग्रामस्थांना या पावसाळ्यात धोकादायक उधाणाचा सामना करावा लागणार आहे.मिर्या बंधार्याच्या अपूर्ण राहिलेल्या अडीचशे मीटरच्या टप्प्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचे हे काम अजूनही शिल्लक आहे. मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचे साडेतीन कि.मी.चे काम करण्यात येणार आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर हा पक्का बंधारा बांधण्यात येत आहे. अडीचशे मीटरचे काम अजूनही शिल्लक आहे.www.konkantoday.com