मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित
मराठा आरक्षणामध्ये सगे सोयऱ्यांचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालं आहे.जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या या उपोषणाचा आज (गुरुवार, 13 जून) सहावा दिवस होता.गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली होती. अखेर राज्य सरकारची मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे पाटील यांनी एक महिन्यांसाठी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे. www.konkantoday.com