पावसाने दिलासा दिल्यामुळे राजापूरवासियांचा पाणीपुरवठा नियमित
मान्सूनपूर्व व त्यानंतर सक्रीय झालेल्या मान्सूनने राजापूरकरांना दिलासा दिला आहे. शहराला नैसर्गिकदृष्ट्या पाणीपुरवठा करणार्या कोदवली येथील सायबाचे धरण भरून वाहू लागल्याने आता शहरात बुधवारपासून पूर्वीप्रमाणे ४ मिनिटे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.राजापूर शहरात दरवर्षी मार्च पासूनच पाणीटंचाई निर्माण होते. शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणार्या कोदवली येथील सारबाचे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर केवळ शिळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. www.konkantoday.com