
डिझाईन तयार न झाल्याने साखरीआगर जेटीचे काम रेंगाळले
तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करीत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमार जेटीचे काम अद्यापही गटांगळ्याच खात असल्याचे समोर आले आहे. या जेटीच्या पुढील बांधकामाचे (प्लॅटफॉर्मचे) डिझाईनच तयार केलेले नसल्याने मान्यतेअभावी गेले ३ महिने जेटीचे बांधकाम ठप्प आहे. पत्तन विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका ठेकेदाराला बसला असून बांधकामाचे साहित्य जेटीच्या ठिकाणी धूळखाात पडले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती ठेकेदार खामकर यांनी दिली. www.konkantoday.com