
खेड बसस्थानकातून सुटणार्या नादुरूस्त गाड्या ठरताहेत वाहतुकीसाठी अडथळला
खेड बसस्थानकातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात मार्गस्थ होणार्या बसफेर्यांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र कायम असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी बस अचानक बंद पडल्याने प्रवासी खोळंबले. बंद पडलेल्या बसमुळे वहतूक कोंडीतही भर पडली. अखेर वाहतूक पोलीस तैनात करून वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आला. पर्यायी बसची व्यवस्था होईपर्यंत प्रवासी मात्र ताटकळत मध्यवर्ती ठिकाणीच उभे होते.सोमवारी रात्री ८ च्या सुमारास येथील बसस्थानकातून सुटलेली बस भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी आली असता अचानक बंद पडली. बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. मध्यवर्ती ठिकाणीच बंद पडलेया बसफेरीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता.www.konkantoday.com