
खेड तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू
खेड तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मालती नारायण पालांडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांच्यावर चिपळूणमधील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना १८ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. मालती पालांडे यांना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले होते




