कोकण रेल्वेने त्यांच्या प्रस्तावित रेंट अ बाइक ही योजना रद्द केली
कोकण रेल्वेने एक महत्त्वाची योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने त्यांच्या प्रस्तावित रेंट अ बाइक ही योजना बुधवारी रद्द केली आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उप महाप्रबंधक बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही योजना रद्द करण्यात आली आहे. कारण या योजनेला स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळं आम्ही गोव्यात दुचाकी भाड्यांने देण्याच्या या योजनेसाठी जारी केलेल्या निविदा रद्द केल्या आहेत.गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या या योजनेला सुरुवातीपासूनच विरोध केला होता. या योजनेमुळं स्थानिक लोकांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. हा प्रादेशिक अस्मितेचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच आम्ही विरोध केला होता. जेव्हा मला कोकण रेल्वे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे आणि येथील पारंपारिक व्यवसायांना याचा फटका बसू शतो हे जाणवले तेव्हा मी याचा कडाडून विरोध केला होता, असं आमदार सरदेसाई यांनी सांगितलं आहे. www.konkantoday.com