इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत १२ वी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

रत्नागिरी, दि. 13 – शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर मुला- मुलींचे (एकूण २) वसतिगृह नव्याने सुरू असून, या वसतिगृहांमध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेशांसाठी संबंधित वसतिगृहमध्ये अर्जांचे वाटप सुरू आहे. तरी इच्छुक व पात्र विद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृहपाल यांच्याकडून वसतिगृह प्रवेश अर्ज घेऊन तात्काळ भरून संबंधित वसतिगृहात जमा करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वसतिगृहात अर्ज उपलब्ध आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व दरमाह निर्वाह भत्ता दिला जातो. या वसतिगृहामध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता संबंधित वसतिगृहात संपर्क साधावा. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button