अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान
रत्नागिरी : आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता संगीत क्षेत्रात पंडित अवधूत अनंत बाम अशी ओळख निर्माण झाली आहे.‘पंडित‘ ही उपाधी मिळालेले अवधूत अनंत बाम हे आकाशवाणीचे कोकणातील एकमेव टॉप ग्रेड संगीतकार आहेत. लहानपणापासून संगीत विषयाचा छंद असल्याने १९७८ ते १९९५ पर्यंत अस्थायी कलाकार आणि १९९५ ते २०१९ पर्यंत आकाशवाणी सेवेत रुजू होऊन आकाशवाणी रत्नागिरीच्या संगीत विभागात त्यांनी आपले योगदान दिले.१९७८ पासून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा संगीत विभाग सुरू झाल्यापासून A ग्रेड सुगम संगीत गायक, तबला वादक आणि आता टॉप ग्रेड संगीतकार होण्याचा मान श्री. अवधूत अनंत बाम यांना मिळाला आहे.श्री. अनंत बाम यांनी कै. पंडित स्नेहल भाटकर आणि कै. पंडित परशुरामबुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितिक वाटचाल सुरू केली.संगीतकार म्हणून नवनवीन चाली बांधताना पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. पंडित अवधूत बाम यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.www.konkantoday.com