अनबॉक्स”तर्फे कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा” या विषयावर आज रत्नागिरीत चर्चासत्राचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरीतील फूड डिलिव्हरी ॲप UNBOX – YOUR DESIRE तर्फे येत्या आज (१३ जून) “कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्लास्टिक, इ-कचरा आदींचे संकलन आणि पुनर्चक्रीकरण या क्षेत्रात खासगी पातळीवर गेली अनेक वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत.हे चर्चासत्र आज सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिर येथील कार्निव्हल हॉटेल शेजारी असलेल्या शर्वाणी हॉलमध्ये होणार आहे. यात पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे (पुणे) डॉ. राजेश मणेरीकर, सह्याद्री निसर्गमित्रचे (चिपळूण) भाऊ काटदरे, रुद्र एनव्हायर्नमेंटल सोल्युशन्सच्या (पुणे) डॉ. मेधा ताडपत्रीकर, रत्नाग्रीन टेक्नोलॉजीजचे (रत्नागिरी) मनीष आपटे, करो संभवच्या (मुंबई) आसावरी पाटील हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. कोकणात मोठ्या पातळीवर आपल्याला कचरा व्यवस्थापनाचे कार्य कसे पुढे नेता येईल याबाबत दिशादर्शन हा या चर्चासत्राचा उद्देश आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले असून, नागरिकांना यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.co.