स्वराज्यतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
रत्नागिरीतील स्वराज्य संस्था ही येथील सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वसा घेवून कार्य करत आहे. अनेक उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे कार्य करत असताना येथील समाज घटकातील अनेक व्यक्तींच्या सेवाभावी कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्या मान्यवर व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनी समाजभूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. तर गुणवंत विद्यार्थ्यांचाही कौतुक सोहळा पार पडला.स्वराज्य संस्था रत्नागिरी समाजभूषण पुरस्कार समिती आयोजित हा कार्यक्रम नुकताच रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशाला, रंजन सभागृहात पार पडला. त्या कार्यक्रमासाठी शांताराम भुरवणे (बँक ऑफ इंडिया, माजी मॅनेजर मुंबई), संजीव सुर्वे (रोटरी मिडटाऊन माजी अध्यक्ष), माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सुवर्णा चौधरी (मार्गदर्शक, स्वराज्य संस्था) ज्योती सुर्वे (हितचिंतक, स्वराज्य संस्था), जितू शिवगण (अध्य, स्वराज्य संस्था), शेखर रेवणे (संस्था उपाध्यक्ष), सेवानिवृत्त अभियंता नागेश कांबळे, माजी नगरसेवक सलील डाफळे, सत्यवान कोत्रे (पुरस्कार समिती अध्यक्ष), विजय पाडावे (पत्रकार), संस्कृती फाऊंडेशनचे संस्थापक राजेश गोसावी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.संस्थेच्या सेवाभावी कार्याविषयी संस्था अध्यक्ष जितू शिवगण यांनी प्रास्ताविक केलेे. तर सूत्रसंचालन प्राध्यापक सत्यवान कोत्रे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते स्वराज्य संस्थेच्या कष्टकरी समाज या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात संस्थेमार्फत समाजभूषण पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते प्रबोधनकार मारूतीकाका जोशी (साखरपा), यशवंत अनंत बिर्जे (रत्नागिरी), शंकर नारायण बैकर (चिपळूण), वैशाली विठोबा घडशी (रत्नागिरी), अनंत रामा ढेपसे (रत्नागिरी), तुकाराम सोनु घवाळी (रत्नागिरी), श्रद्धा सुभाष कळंबटे (रत्नागिरी), आत्माराम सोनू धुमक (लांजा), ऍड. तु. ल. डाफळे (खेड), काशिनाथ गंगाधर पोसकर (दापोली), कमलाकर गोपाळ मसुरकर (असुर्डे, संगमेश्वर), सिताराम धोंडू सांडम (लांजा), विलास नारायण कोळपे (देवरूख) मधुकर धोंडू पवार (राजापूर), महादेव धोंडू साठले (गुहागर) यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी केयुर शेखर ढेपसे, ओम सुधीर मोरे, श्रुती राकेश चव्हाण, ओम केशवकुमार चौधरी, स्वरा साईप्रसाद गोताड, वैष्णवी संजय बाणे, ज्ञानल संजय धामणस्कर, श्रृती अजय घडशी, आर्यन संदीप सालम, योगेश कामत, श्रवण शोधन कळंबटे, कस्तुरी निकेश कळंबटे, लावण्या मिलिंद कीर यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. www.konkantoday.com