
येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील कोसळत आहेत.पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात आली असून ऐन दिवाळीत बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज आहे
www.konkantoday.com