राजापूरमध्ये वीज मीटर रिडींग न घेताच काढली बिले, ग्राहकांना भुर्दंड
विद्युत बिले वाटप करणार्या ठेकेदाराने मे महिन्यामध्ये विद्युत मीटर रिडींग न घेता परस्पर सरासरी वरून प्रत्येक ग्राहकाची बिले काढली असल्याने भरमसाठ बिले आकारण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागलाच, शिवाय वेळेत बिलांचे वितरण केले नसल्याने दंडाची रक्कमही भरावी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये रिडिंग एजन्सीचे टेंडर निघाले. यावेळी नव्याने ठेका मिळालेल्या ठेकेदाराने घरोघरी न जाता गतसालीच्या मे महिन्यातील बिलांचे रिडींग पाहून सरासरी बिले आकारून ती ग्राहकांच्या माथी मारली. www.konkantoday.com