
दापोली-नवशीमध्ये मगर आढळल्याने ग्रामस्थांच्यात खळबळ
जवळपास कुठेही मोठे तळे अथवा नदी नसताना देखील दापोली तालुक्यातील नवशीमध्ये मगर आढळून आल्याने गाावामध्ये खळबळ उडाली आहे.
नवशी-हनुमानवाडी ग्रामस्थांना ही मगर आढळून आली. याबाबत ग्रामस्थांनी सर्पमित्र मिलिंद गोरीवले व तुषार महाडीक यांना कळले असता त्यांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या सहाय्याने नैसर्गिक अधिवासात सोडले. www.konkantoday.com