डीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
डीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी आज (१२ जून) चौथ्या वेळी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. नायडू सरकारमध्ये टीडीपीच्या २०, जनसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी नायडू सरकारमध्ये एकूण २४ मंत्री आहेत. तर पवन कल्याण यांनी देखील आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
www.konkantoday.com