खेड तालुक्यातील सवणस मोहल्ला येथे घरफोडी, ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास

खेड तालुक्यातील सवणस मोहल्ला येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून कपाटातील ५ हजार रुपयांच्या रक्कमेसह ८८ हजार रुपये किंमतीची तांब्याची घरगुती वापरातील भांडी लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मे ते ९ जून या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. अज्ञात चोरट्याने घरात अनधिकृतपणे प्रवेश करत कपाटात ठेवलेली रोख रक्कम व घरगुती वापराची भांडी लंपास केली. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही खाडीपट्ट्यातील संगलट येथे ५ लाख रुपये किंमतीची घरफोडी झाली होती. मात्र या चोरीचा ५ महिने लोटून देखील अद्याप छडा लागलेला नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button