कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची माघार


विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठी अपडेट! कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची माघार
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता आगामी कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवणुकीत एकत्रित लढत मोठ्या प्रमाणात यश मिळवलेल्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.अशातच विधान परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज याबाबतची माहिती दिली आहे. कोकण पदवीधर निवडणूक महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी बोलताना दिली आहे. संजय राऊत म्हणाले, काल(मंगळवारी) आमची चर्चा झाली. त्यामध्ये नान पटोले देखील होते. आम्ही कोकणातून किशोर जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती. पण काल असं ठरलं रायगडच्या, कोकणच्या जागेवरून आमच्या उमेदवारांनी माघार घ्यावी आणि नाशिकच्या मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी, असं एकमत झालं आहे. त्यानुसार आज दुपारपर्यंत दोन्ही उमेदवार माघार घेऊन आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊ.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button