
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली
अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. आता श्रीलंका, भुतान, बांगलादेश, बहरैन, युएई, मॉरिशस या देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.आता जवळपास ९९ हजार १५० मेट्रीक टन कांद्यांची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातबंदी मागील वर्षी केली होती. सुरुवातीला ही निर्यात बंदी मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यातबंदी वाढवली. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलने केली. देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होत असलेल्या नाशिकमध्ये शेतकरी वारंवार कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत होतेwww.konkantoday.com