कॉंक्रिटीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात दापोली आगारात चिखलाचे साम्राज्य
पाऊस पडल्याने दापोली आगारात प्रवाशांना चिखलाचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी खडी टाकणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाने त्याबाबत कार्यवाही न केल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दापोली आगाराचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या मागील बाजूने बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. www.konkantoday.com