कशेडी बोगद्यातून एसटीला नो एन्ट्री झाल्याने त्या परिसरातील प्रवाशांची गैरसोय
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच दुतर्फा वाहतुकीची मुभा असतानाही अवजड वाहतुकीची वाहनेही मार्गस्थ होत होती. यामध्ये एसटी बस फेर्यांचा देखील समावेश होता. या वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बाजूला मजबूत हाईट खांबाची उभारणी करत अटकाव केला आहे. यामुळे एसटी बस चालकांची कोंडी झाली असून कशेडी घाटाचा वापर करावा लागत आहे.
यापूर्वी कशेडी बोगद्यातून दोन्ही दिशांनी एसटी बसेस देखील धावत होत्या. मात्र रत्नागिरीसह रायगड प्रशासनाने अवजड वजनांच्या वाहनांपाठोपाठ एसटी सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला. www.konkantoday.com