
पॉलिफिल्म संपुष्टात आल्याने शासकीय दूधाच्या विक्रीसाठी आरेशक्ती प्रिंटींग पिशवीचा वापर
शासकीय दूध योजना चिपळूण, रत्नागिरीमार्फत विक्री करण्यात येणार्या पिशवीबंद दुधाच्या पॅकींगसाठी वापरण्यात येणारी पॉलिफिल्म संपुष्टात आली आहे. त्यामुळे शासकीय दूधाच्या विक्रीसाठी आरेशक्ती प्रिंटींग पिशवीचा वापर केला जाणार असल्याची माहिती दुग्धशाळा व्यवस्थापकांनी दिली आहे.
तातडीची आवश्यकता म्हणून आरेशक्ती या नावाने प्रिंटींग झालेल्या पॉलिफिल्ममध्ये शासकीय दूध योजना, चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही योजनांचे पिशवीबंद दुधाची विक्री केली जाणार आहे.
konkantoday.com