
मुंबई विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू
विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीवरून मुंबई विद्यापीठातर्फे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील १५८ परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी व वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार १५८ परीक्षांसाठी सुमारे २लाख २२हजार ५८१ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.या कृती आराखड्यान्वये ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन यासह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करून सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रकान्वये लवकरच निर्गमित केल्या जाणार आहेत.
www.konkantoday.com