सुनील तटकरे यांना मंत्रीपद नाकारल्याने कार्यकर्त्यांच्यात नाराजी
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा शपथ घेतली. यंदाची लोकसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात राजकीय उलथापालथ झाल्या. शिवसेनेसह राष्ट्रवादीत दोन गट पडले. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत अजित पवार गट राष्ट्रवादीचे एकमेव खासदार म्हणून कोकणातून रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनिल तटकरे हे यापूर्वी सहा वेळा खासदार राहिलेल्या व केंद्रात मंत्री राहिलेल्या शिवसेना नेते अनंत गीते यांचा मोठा पराभव करून लोकसभेत पोहोचले. सुनिल तटकरे यांना मंत्रीपद मिळेल, अशी सर्वांचीच खात्री होती. मात्र मोदी सरकारमध्ये राज्यसभेचे खासदार असलेले प्रफुल्ल पटेल यांना स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्रीपद देऊ केले. राष्ट्रवादीने ते नाकारले. परंतु प्रफुल्ल पटेल यांचा कॅबिनेट मंत्रीपदावरून राज्यमंत्रीपद देवून अवमान होईल, असा विचार करताना सुनिल तटकरे यांच्या नावाचा विचार न करता कोकणचा अवमान झाला आहे. लोकसभेत जाणार्या सुनिल तटकरे यांचा मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीने विचार न केल्यामुळे कोकणावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. www.konkantoday.com