रत्नागिरी परिसरात पावसाची हजेरी तरी देखील शहरात पाणीटंचाई
मागील काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात तसेच शहर व लगतच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले. असे असतानाही रत्नागिरीकरांची पाणीबाणी काही संपत नसल्याचे दिसत आहे. शहरात अद्यापही एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पाणी योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. www.konkantoday.com