महाड एमआयडीसी त कंपनीत काम करण्यासाठी जाणाऱ्या रात्रपाळीच्या चार कामगारांना वाहनाने उडवले दोघांचा मृत्यू, दोन जण जखमी
महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रात प्रिव्ही कंपनीमध्ये सोलम कोंड ढेबेवाडी येथून रात्रपाळीसाठी घरातून पायी निघालेल्या चार कामगारांना रात्री उशिरा अकरानंतर या मार्गावरून जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच 48 बी एम 26 23 या टेम्पो चालकाने पाठीमागून ठोकर दिली.या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात या गाडीचा चालक चंदन रामकुमार बिंद (वय 23) राहणार जोनपूर उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त वसाहतीमध्ये असलेल्या प्रिव्ही कंपनीत रात्रपाळीसाठी सोलम कोंड येथील चार कामगार पायी निघाले होते. यावेळी त्यांच्या मागून आलेल्या या आयशर टेम्पोने त्यांना उडविल्याचे सांगण्यात आले.
यामध्ये रवींद्र धोंडोभा ढेबे (वय 19) व सचिन शिवाजी ढेबे (वय 18) यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष ढेबे (वय 27) व निलेश ढेबे (वय 18) हे जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
www.konkantoday.com