मनोज जरांगे पाटील यांचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा आहेआता त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. त्यांचा बिपी खालवत चालला असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील गोड बोलून काटा काढायचं काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचं इकडं कठोर उपोषण सुरू आहे. तातडीने मार्ग काढू म्हणायचं आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे. हा डाव सुद्धा असू शकतो त्यांना मराठ्यांची माया असती तर चार चार दिवस उगच त्यांनी दिले नसते. मी कोणतेही उपचार घेणार नाही.
www.konkantoday.com