काटा टोचल्याचे समजूत करून घेतल्याने प्रत्यक्षात सर्पदंश झाल्याने १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
मंडणगड वेळास येथील नारायण नगर येथील मुग्धा राकेश बटावले या १३ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील मुग्धा ही आपल्या घराशेजारी असलेल्या शौचालयाच्या बाजूला गेली असता तिला त्या ठिकाणी सर्पदंश झाला परंतु आपल्याला काटा टोचला असावा अशी तिची समजूत झाली. त्यामुळे ती परत घरी येवून झोपली. यानंतर तिच्या छातीत दुखू लागून तिला चक्कर येवू लागली. मुग्धा हिला उपचाराकरिता खाजगी वाहनाने देवार्हे ग्रामीण रूग्णालय येथे नेण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मंडणगड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासून ती मयत झाल्याचे सांगितले. www.konkantoday.com